बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जमलं बघा! हर्षवर्धन पाटलांची लेक होणार बाळासाहेब ठाकरेंची नातसून

मुंबई | राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक हे राजकारणाबाहेर एकमेकांचे पक्के मित्र असतात अशी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. राज्याला सुसंस्कृत राजकारणाचा मोठा वारसा लाभला आहे. राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांचे नातेवाईक सत्ताधारी गटात असतात. अगदी असंच परत एकदा महाराष्ट्रात घडणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नातसुन म्हणून हर्षवर्धन पाटील यांची मुलगी ठाकरे घरात येणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत सुपुत्र बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांचा विवाह भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील हिच्यासोबत होणार आहे. अंकिता पाटील या सध्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. तर निहार बिंदुमाधव ठाकरे हे वकील आहेत. या विवाहाच्या निमित्तानं महाराष्ट्रात दोन राजकीय घराणे एकत्र येणार आहेत.

28 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये यांचा विवाह संपन्न होणार आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज मनसे प्रमुख आणि निहार यांचे काका राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. कोरोनाचा प्रभाव असल्यानं हा विवाह सोहळा जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. अंकिता पाटील या सध्या राजकारणाबरोबरच सहकार क्षेत्रातही कार्यरत आहेत.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र बिंदुमाधव ठाकरे यांचं 1996 मध्ये एका अपघातात निधन झालं होतं. या घटनेनं बाळासाहेब ठाकरे फार व्यथित झाल्याचंही महाराष्ट्रानं पाहिलं आहे. अशात आता ठाकरे कुटुंबियांच्या या विवाह सोहळ्यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

थोडक्यात बातम्या 

योगी सरकारचा रंगारंग कार्यक्रम! मोदींच्या दौऱ्याआधी एका रात्रीत मस्जिदीचा रंग बदलला

Covishield की Covaxin? ओमिक्राॅनवर कोणती लस प्रभावी?, तज्ज्ञ म्हणतात…

‘…तोपर्यंत निवडणुका नकोच’; राजेश टोपेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

काय सांगता! फक्त 3 मिनिटात तब्बल 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं

“सुप्रिया सुळे मॅडम, हा महाराष्ट्र आहे, आमच्या छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More