मुंबई | देशात कोरोना व्हायरसनंतर आता बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. केंद्र सरकारद्वारे काल केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं सांगण्यात आलं.
तर आता महाराष्ट्रामध्येही बर्ड फ्लूचं सावट असल्याचं चित्र आहे. कारण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कोंबड्या आणि कावळे दगावल्याचं दिसून आलंय.
लातूर जिल्ह्य़ाच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडीमध्ये 350 कोंबड्या दगावल्या आहेत. तर बीड जिल्ह्य़ाच्या पाटोदा तालुक्यातील मुगगावमध्ये 26 कावळे मृत अवस्थेत आढळलेत. यामुळे भितीचं वातावरण दिसून येतंय.
लातूर इथल्या कोंबड्यांचे नमूने पु्ण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. यांच्या चाचण्यांच्या अहवालाची प्रतिक्षा असल्याचं पशुपालन मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
थोडक्यात बातम्या-
‘थोडं राजकारण कमी करा आणि…’; भंडाऱ्यातील दुर्घटनेनंतर सामनातून राऊतांचा केंद्राला सल्ला
धक्कादायक! परराज्यातून आलेल्या तरुणीवर औरंगाबादेत सामूहिक बलात्कार
…नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घातली पाहीजे- आशिष शेलार
“ये पब्लिक सब जाणती है, सुरक्षा कमी करणं हा सरकारचा खुजेपणा”
‘सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच’; अब्दुल सत्तारांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर