Top News राजकारण

भाजपचा ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?

पंढरपूर | लवकरच भाजपाला एक मोठा झटका लागण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जातंय.

शुक्रवारी सरकोलीमध्ये झालेल्या कार्यक्रमात कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित असलेले दिसले. त्यामुळे काळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीची वाट धरणार असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान या कार्यक्रमात आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पध्दतीने काम करू, असं विधान काळे यांनी केलं. यामुळे भाजपला झटका लागणार असल्याच्या चर्चा रंगल्यात.

कल्याणराव काळे यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान कल्याणराव काळेंनी भाजपात प्रवेश केला होता.

थोडक्यात बातम्या-

OLX पे बेच दो…पंतप्रधान मोदींचं कार्यालय चक्क OLX वर विक्रीला

उडता कोहली! हवेत झेप घेत कोहलीने घेतला अविश्वसनीय कॅच; पाहा व्हिडीओ

उर्मिला मातोंडकर यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; सायबर सेलकडे केली तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ते’ पत्र ट्विट करत शेतकऱ्यांना केलं आवाहन

विकासापेक्षा राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकार मोठा-अशिष शेलार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या