बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविका अर्चना बारणेंचं निधन

पुणे | पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविका अर्चना तानाजी बारणे यांचं  डेंग्यूमुळे निधन झालं. पिंपरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये अर्चना बारणे यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अर्चना बारणे यांची काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडली होती. नंतर त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं. उपचारादरम्यान बारणेंच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास अर्चना बारणे यांची प्राणज्योत मालवली. थेरगावमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नगरसेविका अर्चना बारणे यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. कोरोना संसर्गाच्या काळात त्यांनी आपल्या प्रभागात मोठे मदतकार्य केल्याचं बोललं जात आहे.

अर्चना बारणे पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड महापालिकेतून भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या. प्रभाग क्रमांक 23, शिवतीर्थनगर, समर्थनगर, केशवनगरमधून त्या नगरसेवक झाल्या होत्या. बारणेंनी स्थायी समितीचे सदस्यत्व आणि ‘ग’ प्रभाग कार्यालयाचे अध्यक्षपदही भूषवलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट

महाविकास आघाडीतील वाद शरद पवारांच्या दरबारात?; काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

“नानांच्या बोलण्यानं राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली का?”

“इंदुरीकर त्यांच्या कीर्तनातून महिलांबाबत बदनामीकारक वक्तव्य करत होते तेव्हा ही कुठे होती ?”

विद्यार्थ्यांना आता ‘या’ देशात शिकण्याची संधी; राज्यपालांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More