Top News

भाजप फुटीच्या उंबरठ्यावर; डावललेले-नाराज नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत???

मुंबई | राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपच्या नाराज तसेच डावलल्या गेलेल्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. अशातच पक्षातील बंडखोर नेत्यांनी मोठ्या हालचाली सुरु केल्या असून याची परिणीती भाजपच्या फुटीमध्ये होऊ शकते, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपविरोधात आपली नाराजी उघड उघड बोलून दाखवली आहे. नुकतीच पंकजा मुंडे यांनी केलेली फेसबुक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहेत. तर याशिवाय भाजपमध्ये अनेक असे बडे नेते आहेत ज्यांना तिकीट नाकारलं गेलं.

भाजपची राज्यात सत्ता होती, मात्र या सत्ताकाळातही काही नेत्यांना कायमच डावललं गेलं. आता सत्ता गेल्यानंतर अशा नेत्यांनी तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. या हालचाली फुटीत परावर्तीत होऊ शकतात, अशी शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील सत्ता गेल्यानंतर आता नाराज नेत्यांनी बंड केलं तर भाजपसाठी हा फार मोठा धक्का असेल, त्यामुळे नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नही भाजपकडून केले जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या