Loading...

भाजपने कितीही दादागिरी केली तरी मीच जिंकणार; भाजपच्या आमदाराचा दावा

नाशिक | नाशिक पुर्व विधानसभा मतदारसंघात भाजपने दादागिरी केली. सत्तेचा दुरूपयोग केला. मतदानाच्या दिवशी आमच्या गाड्या फोडल्या. माझ्या घरासमोर 20 ते 30 पोलीस उभे करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला मात्र जनता ही असली दादागिरी जनता खपवून घेणार नाही. मीच निवडणून येणार, असा दावा भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांनी केला आहे.

सानप हे भाजपचे माजी शहराध्यक्ष आहेत. मात्र पक्षातल्या काही कारणांमुळे सानप यांना डावलत मनसेतून भाजपत आलेल्या राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बाळासाहेब सानप नाराज झाले.

Loading...

बाळासाहेब सानपांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली.

आपल्यावर दबाव आणला. मात्र जनता भाजपच्या या राजकारणाला भुलणार नाही, आणि ही निवडणुक मीच जिंकणार असा विश्वास सानप यांनी व्यक्त केला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

 

Loading...