बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप असं आडवं पडलं आहे की आम्ही इथून उठणारच नाही- संजय राऊत

मुंबई | कोरोना काळात मुंबईची लोकल सेवा बंद करण्यात आली होती. नागरिकांच्या मोठ्या मागणीनंतर ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना येत्या 15 ऑगस्टपासून लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला आहे. परंतु या निर्णयांवरून पुन्हा एकदा शिवसेना-भाजप आमनेसामने आली आहे.

मुंबई लोकल सुरू करण्याबाबत केंद्राशी राज्य सरकारने चर्चा करायला हवी होती, अशी टीका रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दानवेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

कोरोना काळात राज्यातली परिस्थिती चिंताजनक होती, त्यामुळे मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आली होती. परंतु परिस्थिती आता हळूहळू निवळू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकल सुरू करण्याबाबतचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यावर दानवे यांनी लोकल सरू करण्याअगोदर केंद्रांशी चर्चा करायला हवी होती, असं वक्तव्य केलं होतं. भाजपला असं वाटतंय की आम्ही रस्त्यांवर रूळावर पडलो आहे की जसं कोणी आम्हाला उठवणारच नाही, असा टोला संजय राऊत यांनी दानवेंला लगावला आहे.

दरम्यान, लोकल सेवा करणं, ही संपुर्ण महाराष्ट्राचीच गरज आहे, त्याबाबतीत राज्य सरकार योग्य ते निर्णय घेत असेल तर महाराष्ट्रातून केंद्रात गेलेल्या नेत्यांनी राज्य सरकारला मदत करावी आणि अशा परिस्थितीत कुठलाही वाद, संघर्ष टाळता आला पाहिजे, असं ही संजय राऊत म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

आम्ही दगडूशेठ समोर गाऱ्हाणं मांडलं म्हणून पुण्यातील निर्बंध शिथील झाले”

आदित्य ठाकरेंचा रावसाहेब दानवेंना टोला, म्हणाले ‘आधीचे रेल्वे मंत्री…’

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची तारीख जाहीर; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज

धडाकेबाज फलंदाज स्टीवन स्मिथ घाबरतो जगातील ‘या’ चार गोलंदाजांना; ‘या’ भारतीयाचा आहे समावेश

सोन्याच्या दरात मागील चार महिन्यातील सर्वात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More