“‘टिपू सुलतान’ नामकरणावरून भाजप लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे”
मुंबई | मुंबईतील क्रिडा संकुलनाला ‘टिपू सुलतान’चं नाव देण्यावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. त्यामुळे आता टिपू सुलतान मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता राज्याचे अल्पसख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
टिपू सुलतान नामकरणावरून भाजप लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे, असं म्हणत नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. टिपू सुलतान ब्रिटिशांशी लढले. त्याकाळी ते ब्रिटिशांशी लढताना शहिद झाले. मात्र ते कधीही त्यांना शरण गेले नाहीत, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं.
पुढे मलिक यांनी 2013 साली भाजप नगरसेवकांनी अशाच प्रकारे टिपू सुलतानचे नाव देण्याची भूमिका घेतली होती, याची आठवण करुन दिली.
दरम्यान, क्रिडा संकुलनाला टिपू सुलतान नाव देण्यावरुन भाजपनं विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी पहायला मिळणार आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
‘आम्हाला इतिहास कळतो, तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही’; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार डाॅ. अनिल अवचट यांचं निधन
“लोकांना येडं बनवण्याचं काम चालूये”, चंद्रकांत पाटलांची अजित पवारांवर खोचक टीका
मुंबईत मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली, बचावकार्य सुरू
दरीत अडकलेल्या ट्रकचा थरारक व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
Comments are closed.