बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शेतकऱ्यांच्या झाडांना प्रत्येकी 20 रुपये एवढी प्रचंड मदत केली’

मुंबई | सध्या मुंबईतील वीरमाता-जिजाबाई भोसले उद्यान- प्राणीसंग्रहालयातील पेंग्विनवरील खर्चाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई महापालिका या पेंग्विन्सच्या देखभालीसाठी 15 कोटी 24 लाख रुपये खर्च करणार आहे. याबाबत निवीदा मागवण्यात आल्या असून याबाबत बुधवारी निर्णय होणार आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेते आशिष शेलार (BJP Leader Aashish Shelar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करून सरकारवर टीका करताना , ‘वादळात नुकसान झालेल्या कोकणातील शेतकऱ्यांच्या झाडांना प्रत्येकी 20 रुपये एवढी प्रचंड मदत केली,’ असा टोला त्यांनी लगावला आहे. पुढे त्यांनी, ‘मुंबईतील कोकणातील मच्छीमारांच्या बोटी फुटल्या त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या,’ अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

अशी टीका करून झाल्यानंतर शेलार यांनी पुढे महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi Government) टोला लगावताना ,’पण पेंग्विन देखभाल प्रस्तावात भरघोस वाढ करून 16 कोटी रुपये दिले, असं सुनावलं आहे. यापुढे त्यांनी गुड गोइंग असं म्हणत महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष टोला लगावला होता.

दरम्यान, पेंग्विन देखभालीसाठी तीन वर्षात 15 कोटी 24 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसामागे पेंग्विन्सवर तब्बल 1लाख 47 हजार रुपये खर्च होणार आहे. आधीच पेंग्विन्सच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर अनेक वेळा टीका करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

’25 वर्षाचा संसार मोडला’, असं म्हणणाऱ्या महाजनांना जयंत पाटलांनी दिलं हे सणसणीत उत्तर

पराग अग्रवालच्या नियुक्तीनंतर एलॉन मस्कने केलं भारतीय प्रतिभेचं कौतुक, म्हणाले…

‘आ देखे जरा…’; प्रविण दरेकरांच्या ‘त्या’ ट्विटवर मलिकांचं खास शैलित प्रत्युत्तर

पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीचा फडणवीसांना पश्चात्ताप, म्हणाले मी पुस्तक लिहून…

‘…आणि दुसरीकडे अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षदा’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More