मुंबई | औरंगाबादच्या नामंतरावरून राज्यात राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. महाविकास आघाडीमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रसने संभाजीनगर नाव देण्यला विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळसाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.
औरंगाबादच्या नामकरणाला कडाडून विरोध करून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली असल्याचं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
मालकीण इटालियन असल्याचे परिणाम दुसरं काय?, असं म्हणत भातखळकरांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीवरही निशाणा साधला आहे. यासंदर्भात भातखळकर यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, अतुल भातखळकरांच्या टीकेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काय काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
औरंगाबादच्या नामकरणाला कडाडून विरोध करून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली आहे. मालकीण इटालियन असल्याचे परिणाम दुसरं काय?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 7, 2021
थोडक्यात बातम्या-
अमृता फडणवीसांचं नवं गाणं; ‘डाव मांडते भीती’!
रतन टाटांना वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी दंड; चौकशीत समोर आला धक्कादायक प्रकार!
राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं?- नारायण राण
महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची वर्णी!
स्व. मोहनलालजी बियाणा पत्रकारिता सन्मान!; राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषण