बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“700 आंदोलक शेतकऱ्यांच्या मृत्यूला राकेश टिकैतच जबाबदार”

नवी दिल्ली | शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणारे भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आंदोलनादरम्यान झालेल्या 700 शेतकऱ्यांच्या मृत्यूला राकेश टिकैत जबाबदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेत्याने केलं आहे.

केंद्र सरकारने कृषी कायदे (Farm Law) मागे घेतले तरी शेतकरी एमएसपी (MSP) कायद्यावर ठाम आहेत. साधारण वर्ष झालं तरी शेतकरी आंदोलन सुरूच आहे. त्यात भाजप नेते व उ.प्रदेशातील माजी खासदार हरिनारायण राजभर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आंदोलनातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान (Farmers Protest) झालेल्या 700 शेतकऱ्यांच्या मृत्यूसाठी राजभर यांनी राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांना जबाबदार धरलं आहे. राजभर यांनी टिकैत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांची संपत्ती जप्त करण्याची मागणी केली आहे.

कृषी कायदे मागे घेण्यात आले पण त्याचा तोटा शेतकऱ्यांना होणार आणि फायदा मात्र खलिस्तानी गुंडांना होणार, असं खळबळजनक वक्तव्य राजभर यांनी केलं आहे. दिल्लीतील आंदोलक शेतकरी नसल्याचा आरोपही हरिनारायण राजभर (Harinarayan Rajbhar) यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

चैत्यभूमीवर समीर वानखेडेंच्याविरोधात घोषणबाजी, नवाब मलिक म्हणाले..

“कधी कुणाला दहशतवादी समजून गोळ्या घातल्या जातात तर कधी देशद्रोही ठरवून जेलमध्ये टाकलं जातं, आता फक्त…”

सारा अली खानने दिला आईसोबत काम करण्यास नकार; कारण वाचून थक्क व्हाल

टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा वचपा, 372 धावांनी न्यूझीलंडचा दणदणीत पराभव

महाराष्ट्रात लाॅकडाऊन लागणार?; अजित पवार म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More