मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत व भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात कलगितूरा रंगलेला पाहायला मिळत आहे. राज्यात राऊत विरूद्ध सोमय्या वाद पेटला असताना राऊतांनी अपशब्द वापरत सोमय्यांवर टीका केली.
संजय राऊतांनी अपशब्द वापरत केलेल्या टीकेवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत संजय राऊतांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. सोबतच त्यांनी शिवीगाळ असं हॅशटॅग देखील वापरलं आहे.
शिव्या द्यायला शिवशिवणाऱ्या शिवराळ मनस्थितीचं नाव सर्वज्ञानी, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे. तर गधे को दिया मान.. गधा पहुँचा आसमान, अशी खोचक टीका देखील चित्रा वाघ यांनी केली आहे.
दरम्यान, संजय राऊतांच्या टीकेनंतर मला एकदाच शिव्यांची डिक्शनरी द्या असं मी राऊतांना सांगणार असल्याचा टोला सोमय्यांनी लगावला. संजय राऊत विरूद्ध किरीट सोमय्या वादात आता चित्रा वाघ यांनीही उडी घेतली आहे.
शिव्या द्यायला शिवशिवणार्या शिवराळ मनस्थितीचं नाव “सर्वज्ञानी”
गधे को दिया मान…गधा पहुँचा आसमान 🤣#शिवीगाळ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 21, 2022
थोडक्यात बातम्या-
“मुख्यमंत्री केलं तेव्हा नारायण राणे काय धुतल्या तांदळाचे होते का?”
मोठी बातमी! नारायण राणेंच्या बंगल्यावर मुंबई पालिकेचं पथक रवाना
मोठी बातमी! मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका
Zaira Wasim : “हिजाब ही चाॅईस नसून ही एक जबाबदारी आहे”
…म्हणून साई पल्लवीने नाकारली होती कोट्यवधींच्या जाहिरातीची ऑफर!
Comments are closed.