बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नेताजी पडले! भर कार्यक्रमात भाजप नेता स्टेजवरून कोसळला; पाहा व्हिडीओ

भोपाळ | भाजपने देशातील लोकांपर्यंत मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जनआशीर्वाद यात्रेचं आयोजन केलं आहे. मागील काही दिवसांपासून या यात्रा चांगल्याच चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत. भाजपची सत्ता असलेल्या मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे सध्या जनदर्शन यात्रेनिमित्त मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या यात्रे दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत.

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री चौहान हे खारगोने जिल्ह्यात उपस्थित होते. त्यावेळी व्यासपीठावरून हात उंचावत जनसमुदायास अभिवादन करताना चौहान यांच्या जवळील एक नेता मंचावरून खाली जमिनीवर कोसळले.

या जनआशीर्वाद यात्रे दरम्यान, मुख्यमंत्री चौहान यांनी काँग्रेस नेते राहुल गांधीवर टीकेचे बाण सोडले आहेत. तसेच पंजाबमधील काँग्रेसमधील हालचालींवर देखील टीका केली आहे. या कार्यक्रमात अनेकांनी मास्क न घातल्याने देखील टीका केली जात आहे.

दरम्यान, शिवराजसिंह चौहान यात्रेतील जनसमुदायास हात उंचावत अभिवादन करत होते. त्यांचे सहकारी बोलण्याच्या ओघात मंच्याचा अंदाज न आल्याने मंचावरून खाली कोसळले. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीनं उचललं आहे. तसेच त्यांना कसलीही जास्त जखमी झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

पाहा व्हिडीओ – 

थोडक्यात बातम्या –

“आम्ही भाजप नेत्यांची यादी देतो, त्यांच्यावर कारवाई करणार का?”

“पोकळ शब्दांची नाही तर, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज”

“पक्षाला अध्यक्षच नाही मग निर्णय कोण घेतंय?, आता किती दिवस थांबायचं?”

काँग्रेसला आणखी मोठा धक्का! ‘या’ राज्यातील 11 आमदार अचानक दिल्लीला रवाना

मराठवाड्यात अतिवृष्टीनं हाहाकार! 436 नागरिकांचा मृत्यू; मुख्यमंत्री ठाकरे करणार पाहणी दौरा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More