Top News महाराष्ट्र मुंबई

“हिंदुत्व ज्यांचा श्वास होता अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आदरांजली”

मुंबई | शिवसेना संस्थापक हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांंच्या 95 जंयतीनिमित्त राजकीय नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. अशाच प्रकारे भाजप नेते नारायण राणेंनी आदरांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हिंदुत्व ज्यांचा श्वास होता आणि जन्मभर जे हिंदुत्त्वापासून तसूभरही ढळले नाहीत अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आदराजली, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

भाजप आणि शिवसेनेने युती केली तेव्हा नारायण राणेंना शिवसेनेकडून मुख्यमंत्री बवनण्यात आलं होतं. नारायण राणेंनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात शिवसेनेतून केली होती. नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात नेहमीच टीका-प्रतिटीका होताना दिसतात.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये आज जो भारतीय जनता पक्ष आहे याचं श्रेय बाळासाहेब ठाकरे यांना जातं. ग्रामीण भागात भारतीय जनता पक्ष बळकट आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच, असं शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात भाजप जो काही आहे त्याचं श्रेय बाळासाहेबांना जात- संजय राऊत

“जिल्ह्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली, रेणू शर्माची नार्को टेस्ट करा

कोरोनाची लस घ्यायची असेल तर ही गोष्ट आत्ताच करा, नाहीतर येऊ शकते मोठी अडचण!

लोकांसाठी झटणाऱ्यांना जनता कधीही विसरत नाही- शरद पवार

ब्राझीलच्या राष्ट्रपतींना आठवली संजीवनी; हनुमानाचा फोटो शेअर करत मानले मोदींचे आभार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या