बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले त्यांनी…’; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई | कोरोनापासून कधी मुक्तता मिळेल याबाबत अनिश्चिततेचा फटका पदवी-पदव्युत्तरच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी परीक्षांऐवजी आतापर्यंत मिळवलेल्या गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले, त्यांनी हा निर्णय घेणं हे काही नवल नाही, असं म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.

अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबली तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती. त्यामुळे अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी आतापर्यंतच्या सत्रांत मिळवलेल्या गुणांची सरासरी काढून उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी वाढवण्यासाठी परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

“मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 342 कोटी रुपये जमा, केवळ 7 टक्के रक्कम आरोग्य सुविधांसाठी खर्च”

कोरोना योद्ध्यांवर हल्ले करणाऱ्यांना नरेंद्र मोदींनी खडसावलं, म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

हार्दिक पांड्या म्हणतो, कुणी तरी येणार येणार गं…!

‘सरकारने काम केलं नसतं तर…’; गुजरात उच्च न्यायालयाकडून आता सरकारचं कौतुक

‘ज्यांना आत्मनिर्भर बोलता येत नाही ते…’; तो व्हीडिओ शेअर करत काँग्रेसचा अमित शहांना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More