‘अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे…; महाराष्ट्राची वाट लावू नका’
मुंबई | राज्यात कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. तर येत्या काळात ही रूग्णसंख्या आणखी वाढणार असल्यानं मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लाॅकडाऊनची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे राज्यातील उद्योग धंद्यांवर लाॅकडाऊन परिणाम होत असल्यानं माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.
अजित पवार विसरलेत की ते नुसते उपमुख्यमंत्री नाही तर अर्थमंत्री सुद्धा आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे की, लॉकडाऊन हे महाराष्ट्राला परवडणार नाही. कोरोना हाताळण्याची सिस्टम दर्जेदार करा पण नोकरी धंद्यांचे नुकसान होता कामा नये. महाराष्ट्राची वाट लावू नका, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
मागील लाॅकडाऊनमध्ये राज्यातील तसेच देशातील उद्योगधंद्याना मोठा फटका बसला होता. भारताची अर्थव्यवस्था नकारात्मक आकड्यात गेली होती. नुकतीच अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येत असताना महाराष्ट्र पुन्हा लाॅकडाऊनच्या उंभरट्यावर आहे. त्यामुळे सामान्य उद्योजकांना याचा फटका पुन्हा बसणार आहे.
दरम्यान, राज्यात कोरोेना रूग्णसंख्या वाढत असताना रूग्णालयात बेड्स आणि आरोग्य सोई सुविधांची कमतरता भासत आहे. तर राज्यात संध्याकाळी 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी लावण्यात आली आहे. रूग्णसंख्या आटोक्यात न आल्यास राज्यात पुन्हा लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
पवार- शहा भेटीच्या चर्चेवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
महावितरणची थकबाकी हे भाजपचंच पाप आहे- नितीन राऊत
मोदींनी आदेश दिल्यास माझी ममतांच्या विरोधातही लढायची तयारी – मिथुन चक्रवर्ती
माजी IPS संजीव भट्ट यांच्या पत्नीची भावनिक साद, म्हणाल्या…
‘तुझ्या बॅटमध्ये स्प्रिंग आहेत का?’; षटकार मारल्यावर स्टोक्सनं शार्दुलची बॅट तपासली
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.