बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुंडेने कितीही स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला तरी नियती त्याला सोडणार नाही”

मुंबई | करूणा शर्मा या रविवारी परळीतील वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर करूणा शर्मा पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केलं. त्यानंतर शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आल्यानं नवीन वादाला तोंड फूटलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते निलेश राणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

करूणा मुंडेंची गाडी उघडून त्यात एक व्यक्ती काहीतरी ठेवताना स्पष्ट दिसत आहे. काय चाललंय महाराष्ट्रात? न्याय मागायला आलेल्या महिलेला ही वागणूक मिळते, चूकीच्या केसमध्ये अटक करण्यात येते. मंत्री मुंडेने कितीही स्वत:ला वाचवायचा प्रयत्न केला तरी एक दिवस त्याला नियती सोडणार नाही, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.

दोन दिवसांपुर्वी एका व्हिडीओच्या माध्यमातून परळीत जाऊन गौप्यस्फोट करणार असल्याचं करूणा शर्मा यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्या परळीत दाखल झाल्या. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शर्मा यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, परळीत शर्मायांच्या भोवती लोकांची गर्दी झाली होती. त्यानंतर लोकांच्या जमावात शर्मा यांच्या गाडीत एक संशयित व्यक्ती काही तरी वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर शर्मा यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आलं होतं. त्यावरून या प्रकरणाला आता नवीव वळण लागल्याचं दिसून येत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“मुंडेने कितीही स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला तरी नियती त्याला सोडणार नाही”

‘… त्यांना लाज कशी वाटत नाही’; बेळगाव महापालिकेच्या निकालानंतर राऊत भडकले

14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार, पुण्यातील घटनेनं खळबळ!

पुणे तिथे काय उणे! पुण्यात साडी फक्त नेसत नाहीत तर खातातही, नक्की काय ते जाणून घ्या

मुंबई पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर लालबागमधील गणेश मंडळांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More