बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप नेत्यांचे खिसे एवढे मोठे नाहीत की ते आम्हाला खिशात ठेवतील”

बीड | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यात कलगीतुरा रंगलेला पहायला मिळत आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.

वानखेडे माझा जावई नाही. भारतीय जनता पक्षाचा देखील तो जावई नाही. वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात काही चाललंय ते चालू द्यावं. मात्र, सर्वसामान्य माणूस वानखेडेंच्या मागे उभा आहे. याची टेस्ट नवाब मलिक यांनी घेऊ नये. नवाब मलिक यांच्यासारख्या नेत्यांना खिशात ठेवतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर आता धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे.

भाजप नेत्याचे खिशे एवढे मोठे नाहीत की ते आम्हाला खिशात ठेवतील, ज्यांनी त्यांनी आपापली ठेऊन बोलायला पाहिजे. कोणाला खिशात ठेवतो, कोणाला वाचपाकिटात ठेवतो, अशी भाषा चंद्रकांत पाटलांना शोभत नाही, असंही धनंजय मुंडे म्हणाले आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लबोल केला आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

‘त्याचा आणि समीर दाऊद वानखेडेंचा काय संबंध?’; मलिकांनी शेअर केला नवा फोटो

“धर्मांतर पूर्णपणे थांबलं पाहिजे, हे RSSचं कायम मत राहिलंय”

MPSCच्या उमेदवारांसाठी मोठी बातमी; पूर्व परीक्षेच्या अर्जासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

तरूणाईला कमी वयातच का येतोय हार्टअटॅक? समजून घ्या ‘ही’ महत्त्वाची कारणं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More