भाजप नेत्याच्या मुलाला जाब विचारला म्हणून केली शिवीगाळ!

भाजप नेत्याच्या मुलाला जाब विचारला म्हणून केली शिवीगाळ!

उस्मानाबाद | भाजपचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलाला जाब विचारला म्हणून एका गावकऱ्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. तुळजापूरच्या यमगरवाडीमध्ये ही घटना घडली आहे.

आम्हाला पाणी आणि घरकुलाची सुविधा उपलब्ध करुन द्या, अशी मागणी नेहरु कांबळे यांनी भाजपचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन देशमुख यांच्याकडे केली होती.

नेहरु कांबळे यांनी रोहन देशमुख यांना जाब विचारला म्हणून गावातील मारकड या गावकऱ्याने नेहरु कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. 

दरम्यान, कांबळे यांच्या तक्रारीवरुन तामलवाडी पोलीस ठाण्यात मारकड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधिक्षक घुगे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

सुरेश प्रभू ‘या’ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

राहुल गांधी विमान निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे दलाल- रविशंकर प्रसाद

…तर भाजपचे ‘हे’ मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरणार?

काँग्रेसचे ‘हे’ चार आमदार राजीनामा देणार?

-“आ देखे जरा किसमे कितना है दम”; ज्योतिरादित्य शिंदेंचं भाजपला आव्हान

Google+ Linkedin