Top News महाराष्ट्र लातूर

ना मुंबई गाठली, ना पुणं; जिल्ह्यातच कोरोनाचे उपचार घेऊन बरा झाला भाजपचा ‘हा’ आमदार!

लातूर |   माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे सर्वांत जवळचे आणि निकटवर्तीय आमदार म्हणून लातूर (औसा) चे आमदार अभिमन्यू पवार यांची ओळख आहे. मागील 15 दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र उपचारानंतर ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत.

उपचारासाठी मुंबई पुण्याला न जाता त्यांनी लातुरातच योग्य ते उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. आमदार पवारांनी कोरोनावर मात केल्यानंतर कार्यकर्ते आणि जनतेने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर त्यांच्या चिरंजीवांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारानंतर त्यांचाही रिपोर्ट आता निगेटीव्ह आला आहे. पवार कुटुंबियांनी आता दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, काही दिवसांत आपण प्लाझ्मा दान करणार असल्याची घोषणा आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. तसंच भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांना देखील त्यांनी प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांना कशानं मिळते ऊर्जा?; खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण…

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रुग्ण!

नेपाळी पोलिसांचा भारतीय नागरिकांवर गोळीबार, एक गंभीर जखमी

परिक्षा रद्द झाल्याने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची परिक्षा फी परत करा- राजू शेट्टी

‘…तर दिल्लीवासियांनी आपले ही आभार मानले असते’; गंभीरचा केजरीवालांना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या