बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात काय पोलीस-पोलीस खेळ सुरू आहे का?, आशिष शेलार संतापले

मुंबई | सध्या सगळीकडेच कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. एनसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफिने कारवाई करत या क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. एनसीबीने केलेल्या या कारवाईवर वेगवेगळ्या स्तरांवरून प्रतिक्रीया उमटत आहेत. यात आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत महाराष्ट्र पोलिसांवर निशाणा साधला आहे.

कॉर्डेलिया क्रुझवर एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने ही कारवाई केली होती. या कारवाईत मुख्य भूमिका बजावणारे समीर वानखेडेंनी त्यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी सीसीटीव्ही फुटेजसह मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

समीर वानखेडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर आशिष शेलारांनी पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. महाराष्ट्रात काय पोलीस-पोलीस सुरू आहे का?, असा संतप्त सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे. तक्रारदारावरच पोलिसांनी गुन्हे दाखल करायचे, अनिल देशमुख प्रकरणात तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यालाही पोलिसाकडून धमक्या दिल्याचा उल्लेख शेलारांनी केला आहे.

तर पोलिस अजूनही माजी गृहमंत्री, माजी आयुक्तांच्या मागावर आहेत. आता तर एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा पोलिसाकडून पाठलाग. महाराष्ट्रात काय पोलीस-पोलीस सुरू आहे का?, असा घणाघात आशिष शेलारांनी केला आहे. दरम्यान, समीर वानखेडेंनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात वीजेची टंचाई होणार नाही?, ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

“युद्ध झाले तर भारताचा पराभव अटळ”

बंजी जंपिंग जीवावर बेतलं, रस्सी तुटली अन् तीन मुलं झाली पोरकी, पाहा थरारक व्हिडीओ

“सत्तेत असून 100 टक्के बंद होत नसेल, तर तुमची काय लायकी आहे हे लक्षात येतं”

विराटनंतर आता ‘हा’ भारतीय खेळाडूही सोडणार आयपीएलचं कर्णधारपद?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More