अहमदनगर महाराष्ट्र

…अन् अजितदादांनी जुन्या मित्राला आस्थेनं विचारलं, “तुमची तब्येत बरी आहे ना?”

श्रीगोंदा | भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

एकेकाळी हे दोन नेते एकमेकांचे जिवलग मित्र होते पण पक्ष सोडला आणि नात्यात अंतर पडलं. मात्र आज कित्येक वर्षांनी बबनराव पाचपुते आणि अजित पवार यांची भेट झाली.

अजित पवार नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरीला एक विशेष कार्यक्रम पार पडल्यानंतर अजित पवार श्रीगोंद्यामध्ये आले.

अजित पवारांचं आगमन झालं आणि बबनरावांनी त्यांना गुलाबाच्या फुलांचा बुके देऊन त्यांचं स्वागत केलं. यानंतर तुमची तब्येत बरी आहे ना ? काळजी घ्या, असंही पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

…तेव्हा तुमच्या मंत्र्यांना घरी पाठवलं हे विसरलात काय?- अण्णा हजारे

“कोरोना काळात तुकाराम मुंढेंनी चांगलं काम केलं”

किरीट सोमय्यांच्या मुलावर खंडणी उकळल्याचा आरोप!

जैश उल हिंद दहशतवादी संघटनेनं घेतली दिल्ली स्फोटाची जबाबदारी!

….तर म्हणाल अजित पवार काय भंगार बोलत होता- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या