भाजप आमदाराला गावकऱ्यांनी शिव्या घालत गावातून हाकललं!

भोपाळ | मध्यप्रदेशमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला जात असलेल्या भाजप नेत्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. भाजप सरकारने दिलेली कामे पुर्ण न केल्यामुळे गावकऱ्यांनी भाजप आमदाराला गावातून शिव्या देत हाकलून लावलं आहे.

राजेश सोनकर हे भाजप आमदार प्रचारासाठी सावेरजवळच्या बीसा खेडी गावात गेले होते. तेव्हा गावकऱ्यांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला.

गावातील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी गावकरी अनेक दिवसांपासून करत आहेत. मात्र सोनकर यांनी या मागणीकडे गेली 5 वर्ष ढुंकूनही बघितलं नाही असा गावकऱ्यांचा आरोप आहे.

दरम्यान, रोड नही तो वोट नही अशा घोषणा देत गावकऱ्यांनी सोनकर यांना गावातून पळवून लावलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-तुमच्या वक्तव्यांमुळे आम्ही मार खातो, डायलॉगबाजी बंद करा, संजय निरुपमांना फटकारलं

-मनेका गांधींना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही- सुधीर मुनगंटीवार

-वादग्रस्त जागेवर स्वतःचं मंदिर उभारावं अशी इच्छा खुद्द रामचंद्रांची नसेन!

-मराठ्यांनी 1 डिसेंबरला जल्लोषासाठी तयार रहावे- देवेंद्र फडणवीस

-ओवेसीसारख्या गद्दारांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी!