बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप आमदार गणेश नाईकांच्या नातवाला माळशेज घाटाजवळ मारहाण!

मुंबई | भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नातवाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. माळशेज घाटाच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी मंत्री आणि सध्याचे भाजप आमदार गणेश नाईक यांचा नातू संकल्प संजीव नाईक आणि त्याचा मित्र तेजेंद्रसिंग हरजितसिंह मंत्री हे दोघे कृषीकेंद्र शोधण्यासाठी जात होते. त्यावेळी माळशेज घाटाच्या दिशेने जात असताना तळवली गावाजवळून त्यांनी आपली गाडी पुन्हा मागे फिरवली. यावेळी गाडीच्या मागून येणारा एक दुचाकीस्वार गाडीला धडकले.

धडक दिल्यावर नाईक आणि त्यांचा मित्र गाडीतून खाली उतरले व दुचाकीस्वाराला उचललं. त्याचं नाव विचारलं असता त्यांनी प्रवीण रघुनाथ लिहे असं नाव सांगितलं. हनुमान हॉटेल जवळ नीलेश व तीन साथीदारांनी मारहाण केली होती.

याबाबत टोकावडे पोलीस ठाण्यात 108/2021 भदविस कलम 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

संजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स

“जनताही वेळ येताच सगळा हिशेब चुकता करत असते हे कोणी विसरू नये”

देवेंद्रजी, आता आपणच शासनाला मार्गदर्शन करा- प्रकाश मेहता

“रश्मी शुक्ला यांनी पेन ड्राईव्ह दिला नव्हता तर, फडणवीस कोणत्या पेन ड्राईव्ह बद्दल बोलत होते?”

भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयाला भीषण आग, दोन जणांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More