बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

सांगली |  सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. अशातच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर  यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पडळकरांविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे 19 जुलै रोजी बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा भूमीपूजन सोहळा पार पडला. या भूमीपूजन सोहळ्यास गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांचं स्मारक तयार होत आहे. याच स्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रक गोपीचंद पडळकर हे होते. भूमिपूजन सोहळ्यास देवेंद्र फडणवीस देखील ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झाले होते.

यावेळी बहिर्जी नाईक यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अनेक हिरे होते. याच हिरकांच्या कोंदणातील एक हिरा म्हणजे बहिर्जी नाईक. बुद्धीचातुर्य, शौर्य, स्वामीनिष्ठा, प्रखर राष्ट्रप्रेम या गुणांचा अपूर्व संगम म्हणजे बहिर्जी नाईक.

थोडक्यात बातम्या – 

“मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”

…म्हणून मी फडणवीसांना माझा नेता मानत नाही; पंकजा मुंडेंचं पुन्हा स्पष्टीकरण

“अहो संजय राऊत… निर्लज्जपणालाही काही मर्यादा असतात”

सामना हारल्यानंतर श्रीलंकेच्या प्रशिक्षक आणि कर्णधारामध्ये भांडण??; पाहा व्हिडीओ

तलवारीने सपासप वार झालेल्या पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More