बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भंडाऱ्याची उधळण करत भाजप आमदार महेश लांडगेंचा डान्स, पाहा व्हिडीओ

पिंपरी चिंडवड | भाजप आमदार महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगेचं येत्या 6 जून रोजी लग्न आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नातील मांडव टहाळ कार्यक्रम नुकताच पार पडला.

या कार्यक्रमात आमदारांनी भंडारा उधळत कोरोनासंबंधी सर्व नियम पायदळी तुडवल्याने भाजप आमदार महेश लांडगेंवर टीका होत आहे. भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आमदार लांडगे बेफाम होऊन नृत्य करताना दिसले.

समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटला. महेश लांडगेंचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुफान गर्दी दिसत आहे. अनेक जण विनामास्क वावरताना व्हिडीओत दिसत आहेत. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यामुळे कारवाई होणार का? याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लग्नसमारंभ फक्त एकाच हॉलमध्ये करता येणार आहे. तसेच लग्न समारंभातील सर्व विधी दोन तासांमध्येच पूर्ण करणं नवीन नियमांनुसार बंधनकारक आहे. संपूर्ण लग्नाचा कार्यक्रमासाठी केवळ दोन तासांचा अवधी देण्यात आला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

8 वर्षाच्या प्रेमात मिळाला धोका, त्यानंतर प्रियकराने जे केलं ते पाहून पोलिसही चक्रावले

‘संबित पात्रा म्हणजे गटारीतला कीडा’; लाईव्ह कार्यक्रमात काँग्रेस प्रवक्त्या भडकल्या

“अर्थमंत्रालयात कमी IQ वाले लोक, मोदींना तर अर्थव्यवस्थाच समजत नाही”

नितीन गडकरी म्हणजे चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस- अशोक चव्हाण

“चंद्रकांत पाटलांनी छत्रपतींना उपकाराची आठवण करुन दिली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More