देश

इटलीहून परतल्यानंतर राहुल गांधींनी कोरोना चाचणी केली का?; भाजपची टीका

नवी दिल्ली |  काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे इटलीहून भारतात परतले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राहुल यांनी कोरोनाची चाचणी केली आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

भारतात दाखल होताच राहुल गांधींनी कोरोनाची चाचणी करायला हवी होती?, भारतात त्यांना कोरोना व्हायरस पसरवायचा आहे का? असं म्हणत रमेश बिधुरी यांनी निशाणा साधला आहे. राहुल दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीला भेट देणार आहेत. यावरुन बिधुरी यांनी टीका केली आहे.

पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 15 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर परदेशात भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची, प्रवाशांची तपासणी केली जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोना व्हायरस भारतात पसरत असून आतापर्यत 29 लोकांना याची लागण झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्र्यांना न विचारताच राष्ट्रवादीचे मंत्री निर्णय घेतात का?; भाजपचा सवाल

पाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत म्हणाला 2 लाख कर्ज आज माफ झाले; बच्चू कडूंनी शेअर केला व्हिडीओ

महत्वाच्या बातम्या-

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी रामदेव बाबांकडे रामबाण उपाय?

हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा रितेशचा टिक टाॅक व्हिडीओ पाहिलात का?

कोरोनापासून वाचण्यासाठी भारतीयांची ‘ती’ पद्धत वापरा; इस्राईलच्या पंतप्रधानांचा सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या