बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डॉक्टर भाजप खासदाराच्या स्वागतात मग्न; महिलेचा उपचाराअभावी मृत्यु

लखनऊ | डॉक्टरांचा निष्काळजीपणा आणि औषधांच्या अभावामुळं एका महिलेचा मृत्यु झाल्याची घटना घडलाय. शनिवारी उत्तरप्रदेशमधील सिद्धर्थनगर जिल्यात हा प्रकार घडला. रुग्णालयातील डॉक्टर हे स्थानिक भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या स्वागताच्या तयारीत मग्न होते त्यामुळे हा प्रकार घडल्याचं कळतंय. 

सावित्री सुरेश मौर्या असं त्या महिलेचं नाव आहे. शुक्रवारी रात्री तिला रुग्णालयात दाखल केलं होतं. तेव्हा तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले नाही. शनिवारी सकाळी रुग्णालयाचे कर्मचारी स्थानिक खासदारांच्या स्वागताच्या तयारीत होते. योग्यवेळी उपचार न झाल्यानं तिचा मृत्यु झाल्याचा आरोप पती सुरेश यांनी केलाय. 

दरम्यान, पाल यांनीच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. सिद्धर्थनगर पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या –

-कर्नाटकात अजूनही भाजपची दहशत; काँग्रेस-जेडीएसचे आमदार नजरकैदेत!

-भाजपच्या जखमांवर मीठ; कुमारस्वामींच्या शपथविधीला विरोधक एकवटणार!

-काँग्रेसनं फक्त घोडेबाजारच केला नाही तर घोड्यांचा अख्खा तबेलाच विकला!

-“हमारे पास अमित शहा है”; भाजपच्या या व्हीडिओची सोशल मीडियात खिल्ली

-कर्नाटकात भाजपचं सरकार कोसळल्यानं शिवसेना भलतीच खूश!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More