Top News महाराष्ट्र सातारा

“मला धक्के देण्याची सवय, कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच”

सातारा |  भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानक साताऱ्याती पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचं उद्घाटन करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या स्टाईलमध्ये आपली प्रतिक्रिया दिली.

मला धक्के देण्याची सवय आहे. कधी दुसऱ्याला बसतो कधी मला स्वत: ला बसतो. ‘आदत से मजबूर’ म्हणतात तसं आहे. जुन्या सवयी जात नाहीत. मी राजकारण कधी केलं नाही. ते मला जमणारही नाही, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

मी आजवर समाजकारण केलं. तेही लोकांचं हित नजरेसमोर ठेवून केलं. तेच लक्षात ठेवून माझी पुढील वाटचालही असणार आहे, असं उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, इतरांची जशी एक स्टाईल असते तशी आपलीही आहे. आपल्याला कोणी शाबासकी देवो अगर नको. स्वत:ला शाबासकी देण्याचा अधिकार मलाही आहे आणि ती आपली पद्धत असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘आयुक्त साहेब जरा याचंही उत्तर द्या’; विशाल तांबेंचं आयुक्तांना पत्र

‘…केलं ना तुमचं काम, आता सत्कार कशाला यामुळेच तुम्ही मागं राहता’; अजित पवार भडकले 

चोर आले म्हणून पोलीस पळून जातात ही केविलवाणी गोष्ट- अजित पवा

“कोरोनाची पहिली लस पंतप्रधान मोदींनी घ्यावी, मग आम्ही घेऊ

KGF 2 चा टीझर वेळेच्या आधीच रिलीज; रचला नवा रेकाॅर्ड, पाहा व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या