“जे 60 वर्षात झालं नाही ते गेल्या साडे चार वर्षात झालं”

नवी दिल्ली |  जे 60 वर्षात झालं नाही ते गेल्या साडे चार वर्षात झालं, असं वक्तव्य केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते.

सवर्णांना 10 टक्के आरक्षण देऊन, भारताला सामाजिक न्यायाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, असंही गडकरी म्हणाले.

दलित, वंचित, पिडीत या सगळ्या घटकांना आम्ही पुरेपुर न्याय दिला आहे, असा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे.

दरम्यान, राजधानी नवी दिल्ली येथे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन चालू आहे.

महत्वाच्या बातम्या-

-दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पुण्याचे मेजर शशीधरन नायर शहीद

-शिवसेनेनं मागणी तर करावी त्यांना काय हवं आहे- रावसाहेब दानवे

-“आम्ही जे वायदे केले होते ते आम्ही पूर्ण केले, भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय”

-भाजपच्या युथ ब्रिगेडचा नवा नारा ‘मोदी अगेन’

-विखे पाटलांना मोठा धक्का; निवृत्त आयएएस मेहुण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश