Top News पुणे महाराष्ट्र

भाजपने मेधा कुलकर्णींना पुन्हा डावलले; विधान परिषदेची उमेदवारी नाहीच

पुणे | कोथरुड विधानसभाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजपने पुन्हा एकदा डावलले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची त्यांना आशा होती. परंतु त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यावेळी मेधा यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता.

मेधा कुलकर्णी यांच्या जागी पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी सांगलीच्या संग्राम देशमुख यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

दरम्यान, मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीबाबत चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले की “संग्राम देशमुख माझा जावई नाही आणि मेधाताई काही माझ्या दुश्मन नाही”.

महत्वाच्या बातम्या-

अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीची धाड!

अर्णब गोस्वामी यांच्या केसालाही धक्का लागला तर…- राम कदम

कोरोना लसीसंदर्भात संपूर्ण जगासाठी मोठी बातमी!

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसी थेट होर्डिंगच्या खांबावर चढली, अन्…

काळ जरी कठीण असला तरी, कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये- अनिल परब

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या