मुंबई | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधलाय. संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का? असा सवाल त्यांनी केलाय.
बिहार निवडणुकीचे निकालानंतर नितीश कुमार हे मुख्यमंत्री होतील हे ठरलं. त्यावेळी तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेले नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्यास तो बिहारच्या जनतेचा अपमान ठरेल असं संजय राऊत म्हणाले होते.
यावर, जर हाच नियम महाराष्ट्रात लागू केला तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना विचारलाय. त्याचप्रमाणे शिवसेना मांडत असलेली ही भूमिका दुतोंडी नाही का? असंही ते म्हणालेत.
प्रवीण दरेकर पुढे म्हणाले, बेरोजगारीच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार पळ काढतंय. शिवाय हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा प्रयत्न आणि अधिवेशनापासून पळ काढण्याचा हा प्रयत्नही केला जात असल्याचं दिसतंय.
महत्वाच्या बातम्या-
दिवाळीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा!
‘शवसेना’ म्हणत अमृता फडणवीसांची शिवसेनेवर बोचरी टीका, म्हणाल्या…
“ज्यानं मराठी बाईचं कुंकू पुसलं त्याला वाचवण्याचा प्रयत्न दिल्लीपासून होतोय”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्मा टीमसोबत रवाना झाला नाही, कारण…
“भाजपची कित्येक ठिकाणी डिपॉझिट जप्त झालीय, त्यांनी आत्मपरीक्षण केलं तर आम्ही सुद्धा करु”