कोल्हापुरात भाजपला झटका, महापाैरपदी राष्ट्रवादीने मारली बाजी

कोल्हापुरात भाजपला झटका, महापाैरपदी राष्ट्रवादीने मारली बाजी

कोल्हापूर|कोल्हापूर महापालिकेत आज महापौर पदासाठी निवडणूक झाली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांची निवड झाली आहे.

सरिता मोरे यांनी भाजपच्या जयश्री जाधव यांचा 41 विरुद्ध 33 असा पराभव केला आहे. मतदानापूर्वी राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक सदस्य अपात्र ठरवूनही आघाडीने या निवडणूकीत बाजी मारली.

यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली.

दरम्यान, खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी महापौरपदाचं आरक्षण होतं. महापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सरिता मोरे व उपमहापौरपदासाठी भूपाल शेटे रिंगणात होते. 

महत्वाच्या बातम्या-

-अहमदनगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर,वाचा ताजे कल

-साहेब नोकरी करतोय, राजकारण नाही; स्वाभिमानी DYSPनं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावलं

-श्रीपाद छिंदमला लोकांनी दिला मोठा झटका; छिंदम पिछाडीवर…

-कांगारुंना धोबीपछाड; टीम इंडियाचा एेतिहासिक विजय

अहमदनगरमध्येही भाजप आघाडीवर, पाहा काय आहेत पहिले कल…

Google+ Linkedin