बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर भाजप आमदाराला चपलीनं मारू; भाजप प्रवक्त्याची भाजप आमदाराला धमकी

ठाणे | कोरोना संकटात काही आमदार आणि खासदार लोकांच्या मदतीला धावून येताना दिसत आहे. पण उल्हासनगरचे भाजपचे आमदार कुमार आयलानी हे लोकांची मदत न करता फिरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच आता भाजपचे प्रवक्ते राम वाधवा यांनी थेट भाजप आमदाराला चपलीनं मारण्याची धमकी दिली आहे. कुमार आयलानी हे लोकांची कामं करत नाही. त्यामुळे त्यांना दररोज चपलीनं मारू, अशी धमकी भाजपचे प्रवक्ते राम वाधवा यांनी दिली आहे.

कुमार आयलानी हे कोरोनाच्या कठीण काळात शहरात फिरत नाही. तसेच ते लोकांची काहीही मदत करत नाहीत. आयलानी हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत त्यांच्या लोणावळ्याच्या कुमार रिसॉर्टला जात असतात. येत्या आठ दिवसात कुमार आयलानी यांनी दररोज शहरात फिरावं, लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. अन्यथा त्यानंतर त्यांना दररोज आम्ही चपलीनं मारू, असा इशारा राम वाधवा यांनी दिला आहे.

राम वाधवा यांनी यापूर्वी निवडणुकीच्या काळात पप्पू कलानी यांना आतंकवादी म्हणून संबोधलं होतं. त्यामुळेही बराच वाद उल्हासनगर शहरात पेटला होता. त्यानंतर देखील राम वाधवा हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता आमदार कुमार आयलानी याच्यावर टीका केल्यानं राम वाधवा यांच्यावर भाजप कार्यकर्ते नाराज असल्याचं कळत आहे.

दरम्यान, राम वाधवा यांच्या या धमकीमुळे उल्हासनगरात खळबळ उडाली आहे. राम वाधवा यांनी याबाबत ट्वीट केलं असून त्यात त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही टॅग देखील केलं आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

‘या’ जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या साडेसात हजारांवरून थेट 3 हजारांवर

‘प्राण कंठाशी आलेल्या लोकांना वाली कोण?’; सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर कडाडून टीका

दिलासादायक! मुंबईतील कोरोनाबाधितांंच्या संख्येत घट; कोरोनामुक्तीचा दर 91 टक्यांवर

ऑक्सिजनसाठी अशोक चव्हाणांकडे 15 लाखांची मागणी; चव्हाणांचा थेट नितीन गडकरींना फोन

‘या’ जिल्ह्यात लहान मुलांना मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More