मुंबई | नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत गैरप्रकार झाला असून आम्ही निवडणुक आयोग आणि मुंबई हायकोर्टात धाव घेणार आहोत. निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी मतदान हे मतपत्रिकेवर नाही तर EVM मशीनवर घेण्यात यावं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुण्यातील काही मतदारांना जाणिवपुर्वक त्यांच्या राहत्या घरापासून दुरच्या मतदान केंद्रावर मतदान करण्यास भाग पाडलं गेलं. तर पदवीधर मतदारसंघात आठवी पास तदारांचीही पदवीधर मतदार म्हणून नोंदणी आढळून आल्याचं पाटील म्हणाले.
दरम्यान, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजपला एकाच जागेवर समाधान मानावं लागलं होतं. तर भाजपचा बालेकिल्ला मानले जाणारे पुणे आणि नागपूर हे हक्काचे मतदारसंघ भाजपने गमावले होते.
थोडक्यात बातम्या-
“दादा बंगालचा वाघ, भाजपमध्ये आल्यास स्वागत त्याचं नक्कीच स्वागत करु”
‘होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरलात’; नाव घेता पडळकरांची शरद पवारांवर टीका
जगात भ्रष्टाचाराचे नवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्यांसाठी असते का एखादे भारतरत्न- भाजप
संभाजी महाराजांबद्दल अॅलर्जी असेल तर तर दुसरं नाव सांगा- चंद्रकांत पाटील