बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांचा आरोप हास्यास्पद, 50 वर्षे राजकारणात असलेल्या व्यक्तीने…”

कोल्हापूर | उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले होते. त्या घटनेवर राज्यातील अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेचा संदर्भ जालिनवाला बाग हत्याकांडाशी लावला होता. त्यानंतर राज्यात ईडीने छापे टाकले, असा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसने भाजपवर केला आहे. आता याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

आयकर विभागाच्या धाडी अचानक पडत नाहीत, त्यासाठी सहा महिने तयारी करावी सुरू असते. आज आरोप केला आणि उद्या इडीची धाड पडली, असं कधी होत नाही. शरद पवार यांनी लखीमपूरच्या घटनेचा संदर्भ जालियनवाला बाग हत्याकांडाशी लावला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांवर धाडी पडल्या, 50 वर्षे राजकारणात असलेल्या व्यक्तीने असा आरोप करणे, हे तर आणखी हास्यास्पद आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केली.

राज्यात आयकर, सीबीआय, ईडीच्या धाडी पडतच असतात. पवारांशी संबंधित कुटुंबावर प्रथमच या धाडी पडल्या. त्यामुळे ते लगेच सूडबुद्धीने कारवाई होत असल्याची टीका करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली की लगेच सूडाचे राजकारण असल्याचा आरोप होतो. असे आरोप म्हणजे घटनेने ज्या संस्था निर्माण झाल्या त्यांच्यावरच संशय घेण्यासारखे आहे, असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर लगावला आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या संंबंधित व्यक्ती आणि साखर संस्थांवर ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. ईडीने टाकलेल्या अचानक धाडीवर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी भाजपवर टीका केली.

थोडक्यात बातम्या- 

महात्मा गांधी आणि सावरकर यांच्या वादात जावेद अख्तरांची उडी, म्हणाले…

“देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलंय”

“मला शिव्या दिल्या म्हणजे मतं मिळतील असा भाजपचा समज झालाय”

“शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये ‘राष्ट्रीय नेतृत्व’ करण्याची क्षमता”

“…म्हणून शिवसेनेतून एक टपरीवाला आज मंत्री होऊ शकतो”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More