बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप आता राज्यात 1 नंबरचा पक्ष बनलाय”

मुंबई | महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन आता दोन वर्ष पुर्ण झाली आहेत. अशातच भाजप नेत्यांनी आता राज्यात भाजपचं सरकार येणार असा दावा केला आहे. त्यावरून भाजप आणि शिवसेना नेत्यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पहायला मिळतंय. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. (Chandrakant Patil has criticized Shiv Sena)

शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्ष संपवला आहे. राज्यात भाजप हा नंबर एकचा पक्ष बनला आहे, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. शिवसेनेने मात्र मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपविला आहे. हे अजूनही त्यांच्या लक्षात येईना, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकांत भाजपने 21 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 17 जागा मिळाल्या तर शिवसेनेला केवळ 12 जागाच मिळाल्या असंही पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, गावोगावी राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाडाव सुरु केला आहे. तरीही ही गोष्ट शिवसेनेच्या लक्षात येत नाही.  हा त्यांचा प्रश्न आहे. यापुढे भाजप सर्व निवडणुका पक्ष चिन्हावरच लढवेल, अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

परमबीर सिंह आणि सचिन वाझेंच्या ‘त्या’ भेटीविरोधात गृहमंत्र्यांनी उचललं मोठं पाऊल

“मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार”

‘शेतकऱ्यांच्या झाडांना प्रत्येकी 20 रुपये एवढी प्रचंड मदत केली’

12 खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक; उचललं ‘हे’ मोठं पाऊल

‘दी़ड फूटी उंची असणाऱ्या पोपटाचा जन्मच शिमग्याला झाला आहे’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More