बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वडेट्टीवारांनी हा शोध कुठून लावला?; त्यांची डोकी तपासण्याची वेळ आलीये”

पुणे | देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची हे भाजप नेते नितीन गडकरी यांच्याशी बोलून आधीच ठरवलं होतं, असं खळबळजनक वक्तव्य काॅंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यानंतर या प्रकरणाची चर्चा राज्यात जोरदार रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांची डोकी आता तपासण्याची वेळ आली आहे. ज्यांना जे जे वाटत आहे, ते ते बोलत आहेत. जिरवणे वैगेरे जाहीर सभेत वापरण्याचे शब्द आहेत का? त्यामुळे खोटं बोला, परंतु रेटून बोला हा स्वभाव सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांचा झाला आहे. त्याचाच एक भाग विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याचा आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

नितीन गडकरी देशातील सर्वांचे नेते आहेत. ते आमच्या सगळ्यांची काळजी घेत असतात. त्यांच्या विचारांची आणि पक्षावरची निष्ठा कायम आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवारांनी हा शोध कुठून लावला आहे, ते मला सांगता येणार नाही, असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी वडेट्टीवारांना लगावला आहे.

दरम्यान, नांदेड मधील बिलोली येथील प्रचारसभेत विजय वडेट्टीवार यांनी फडणवीस आणि गडकरी यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. नागपूरमध्ये फडणवीस आणि गडकरी असे दोन टोक आहेत. त्या दोन टोकांची दिशा विरूद्ध दिशेला आहेत आणि त्या दोघांमध्ये 36 आकडा आहे, असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं होतं. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पठ्ठ्यानं एकाच षटकात खेचले 8 षटकार; ‘या’ खेळाडूची क्रिकेटविश्वात चर्चा

अखेर सुयश आणि आयुषी अडकले विवाहबंधनात; पाहा फोटो

“उभा महाराष्ट्र मला ओळखतो, मी आयुष्यात कधीच बेईमानी केली नाही”

पहिल्यांदा टीका, आता अभिनंदन! चित्रा वाघ यांच्याकडून रूपाली चाकणकरांना खास शुभेच्छा

‘रूपाली चाकणकरांनी महिलांसाठी केलं तरी काय?’; शालिनी ठाकरेंचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More