पूजा चव्हाण प्रकरणी भाजपकडून नीलम गोऱ्हे टार्गेट; ताई लवकर या आणि भूमिका घ्या!
मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण पेटलं आहे. शिवसेनेचे मंंत्री संजय राठोड यांचं या प्रकरणामध्ये नाव समोर येत आहे. सोशल माध्यमांवर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप आणि काही फोटोंमुळे राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मात्र राठोड यांनी या प्रकरणातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपनेही हे प्रकरण लावून धरलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत संजय राठोड यांच्यावर कारवाई करत राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. मात्र या प्रकरणावरून भाजपच्या समर्थनार्थ चालवल्या जाणाऱ्या सोशल मीडिया पेजेसवरुन शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांना टार्गेट केलं जातं आहे.
सत्ता आल्यापासून डॉ. नीलम ताई गोऱ्हे महिला अत्याचार विरोधी बोलताना दिसत नाहीत. अत्याचार मात्र प्रचंड वाढला आहे! ताई कुठे आहेत तुम्ही, असा सवाल नीलम गोऱ्हेंना करण्यात आला केला आहे. त्यासोबतच गेल्या दीड-दोन वर्षापासून अत्याचार विरोधी लढाई त्यांनी बंद केली आहे, असंही भाजपच्या सोशल मीडिया पेजेसवर सांगण्यात आलं आहे. भाजपनेही हे प्रकरण लावून धरलं आहे.
संजय राठोड यांच्यावर कारवाई होत नाही. त्यावर मी राठोड यांना दोष देणार नाही. त्यांच्यावर त्यांच्या वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यानेच पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
दरम्यान, राठोडांनी राजीनामा दिला नाही तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व सदस्य राजीनामे देतील, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नका, नाहीतर… पोहरादेवीच्या महंतांचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा
पुण्यात शाळा, महाविद्यालये ‘या’ तारखेपर्यंत बंद; वाचा महापालिका आयुक्तांचा नवा आदेश
राठोडांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही राजीनामा देणार; देवेंद्र फडणवीसांचा इशारा
संजय राठोडांची विकेट पडल्यानंतर वनमंत्रिपद कुणाला?, ‘या’ नावांची जोरदार चर्चा
…म्हणून इमरान हाश्मीने दिला आलिया भट्टसोबत काम करण्यास नकार!
Comments are closed.