बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लॉकडाऊनच्या निर्णयाला भाजप सकारात्मक प्रतिसाद देईल पण…’; प्रविण दरेकरांचं मोठं वक्तव्य

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनानं थैमान घातलं आहे. दिवसागनिक कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या सर्वपक्षीय नेत्यांची लॉकडाऊनबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. आज एमपीएससी परीक्षेचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली.

आज एमपीएससी परीक्षेचा निर्णय घेण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत चर्चा सुरू झाल्याने विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी इतर पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्याशिवाय हा निर्णय होऊ शकत नाही, असं मत व्यक्त केलं.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी हातावर पोट असलेले मजूर, गोरगरीब जनता, छोटे व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी ठाकरे सरकारने ठोस पावले उचलुन त्यांच्यासाठी काही करण्याचं ठरवलं तर, आम्ही महाराष्ट्रातील लॉकडाऊन संदर्भात सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं सांगितलं आहे. आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्य सरकार सध्या संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली असून या बैठकीत महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच आज प्रवीण दरेकर यांनी लॉकडाऊन संदर्भात प्रतिक्रिया दिल्याने राज्य सरकार विरोधी पक्षाचं ऐकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

धमाकेदार ऑफर! ‘या’ शहरात मिळतेय कोरोना लस घेणाऱ्यांना मोफत बिअर

“मी गौतम गंभीरला माझा आदर्श मानतो”; ‘या’ स्टार खेळाडूनं सांगितलं गुपित

“निदान भाजपच्या 105 आमदारांच्या मतदारसंघातील लोकांसाठी तरी लस आणा”

पिंपरी-चिंचवडमध्ये व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही; प्रशासनाची धक्कादायक कबुली

लस उत्सवावरून राहूल गांधींचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र; केलं ‘हे’ आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More