बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांचाही सरकारला डोस, भाजपची रविवारी बूस्टर डोस सभा

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या रविवारी होणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असताना आता भाजपने (BJP) देखील त्यांच्या सभेची घोषणा केली आहे. औरंगाबादमध्ये राज ठाकरे तर मुंबईत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सभा घेत रविवारचा दिवस गाजवणार आहेत.

मुंबईतील सोमय्या मैदानावर भाजपची सभा पार पडणार असून या सभेला ‘बूस्टर डोस सभा’ असं नाव देण्यात आलं आहे. भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषद घेत या सभेची घोषणा केली आहे.

भाजपच्या बूस्टर सभेतून शिवसेना व महाविकास आघाडीची पोलखोल करण्यात येणार आहे. या सभेतून भाजप कार्यकर्त्यांना बूस्टर तर विरोधकांना डोस देण्यात येणार असल्याचंही आशिष शेलार म्हणाले आहेत. शिवसेनेची (Shivsena) आम्ही पूर्णपणे पोलखोल करू, असा इशारा देखील शेलारांनी दिला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र दिनी अर्थात 1 मे रोजी भाजपने रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. या सोहळ्यातच देवेंद्र फडणवीसांची बूस्टर डोस सभा पार पडणार आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही एकाच दिवशी सभा घेत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) घेरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांचा ‘शकुनी काका’ असा उल्लेख करत पडळकरांचा हल्लाबोल, म्हणाले..

ट्विटरनंतर एलॉन मस्क खरेदी करणार ‘ही’ मोठी कंपनी, ट्विट करत म्हणाले…

खऱ्या आयुष्यातील जोडी मोठ्या पडद्यावरही एकत्र, ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटातील खास फोटो समोर

मोठी बातमी! या अटी-शर्तींसह राज ठाकरेंची सभा होणार?

राज्यात कोरोनाचे नवे variant आढळल्यानंतर राजेश टोपेंनी दिली ‘ही’ अत्यंत महत्त्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More