महाराष्ट्र सोलापूर

भाजपचे सोलापूरचे उपमहापौर राजेश काळेंना दणका; पक्षाने केली मोठी कारवाई

सोलापूर | सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना उपायुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर राजेश काळे यांची आज भाजपतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

राजेश काळे यांच्यावर महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला होता.

भाजपच्या गोटातून राजेश काळे यांची उपमहापौर पदावरुन आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे अखेर भाजपच्या कार्यकारिणीने हा निर्णय घेतला. भाजपचे शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी याबाबत घोषणा केली.

दरम्यान, भाजपतील काही लोकांनीच माझ्याविरूद्ध षडयंत्र रचल्याचा राजेश काळे यांनी आरोप केला आहे. मी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे मात्र खंडणी मागितलं नसल्याचं राजेश काळे यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा, मंत्रीपदावर राहण्याचा त्यांना हक्क नाही”

‘कोरोना लसीवर विश्वास नसेल तर पाकिस्तानात निघून जावं’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

17 वर्षीय दिव्यांग मुलीवर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!

‘निवडणुकीत पुरुष नेत्यांशी संपर्क असेल तरच महिलांना तिकीट’; राष्टीय महिला आयोगाच्या अध्यक्षांचं वक्तव्य

कलियुगातील संजीवनी मुंबईत आली- महापौर किशोरी पेडणेकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या