बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओ जाने वाले, हो सके तो लौट के आना…- सुधीर मुनगंटीवार

मुंबई | एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, खडसे हे शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची बातमी पक्षासाठी चिंतनाची बाब आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

ज्यांनी 40 वर्षे पक्षांची सेवा केले ते आज राष्ट्रवादाचा बुरखा पांघरलेल्या राष्ट्रवादीत जात आहेत, हे धक्कादायक आहे. मीही त्यांच्या नेतृत्वात काम केलंय. त्यामुळे, एकनाथ खडसेंना मी एवढचं म्हणू शकतो, ओ जानेवाले हो सके तो लौट के आना, असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

एकनाथ खडसेंनी त्या प्रमोद महाजनांसोबत काम केलंय. पण, एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश ही धक्कादायक बातमी आहे, असं मुनगंटीवार म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

भाजपचे ‘इतके’ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर; जयंत पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार- जयंत पाटील

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर…- बच्चू कड

…म्हणून अजित पवारांनी अतिवृष्टी पाहणी दौरा केला रद्द

अतिवृष्टीग्रस्तांना गुरुवारी आर्थिक मदत जाहीर करणार- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More