बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारायण राणेंची महाविकास आघाडीवर कुरघोडी; वेंगुर्ला नगरपरिषदेवर फडकावला भाजपचा झेंडा!

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडी सरकारला धोबीपछाड दिली आहे. भाजपच्या उपनगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार शितल आंगचेकर यांनी महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे उमेदवार विधाता सावंत यांचा 10 विरूद्ध 7 अशा फरकाने पराभव केला आहे.

वेंगुर्ला नगरपरिषदेवर नारायण राणेंनी आपला झेंडा रोवला आहे. काँग्रेसकडून गटनेते प्रकाश डिचोलकर यांनी व्हीप जारी केला होता. मात्र, काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी व्हीपला केराची टोपली दाखवली आहे. म्हणूनच भाजपने विरोधकांना धूळ चारत विजय प्राप्त केला आहे.

भाजपकडून केंद्रात मंत्री असलेल्या नारायण राणेंनी आधी काँग्रेसला रामराम करत भाजपचं कमळ हातात धरलं आहे. राणेंच्या पक्षांतरांमुळं जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. अपक्ष नगरसेवक असलेले तुषार सापळेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता, पण या उपनगराध्यक्ष निवडणुकीत त्यांनी तटस्थ राहणं पसंत केलं.

दरम्यान, वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावर आल्या आहेत. वेंगुर्ला नगरपरिषदेवर आज भाजपची सत्ता आहे. त्यामुळं आगामी निवडणुकीत भाजपचं पारडं जड राहणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. तसेच आगामी काळात आता भाजप विरूद्ध काँग्रेस अशी लढाई असण्याची शक्यता आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये 17 नगरसेवकांपैकी भाजपचे 7, काँग्रेसचे 7 तर शिवसेना 2 आणि अपक्ष 1 असं बलाबल आहे.

थोडक्यात बातम्या –

यंदाचा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार ‘या’ 3 संशोधकांना जाहीर!

मोदी लाट पुन्हा एकदा! 44 पैकी 41 जागा मिळवत मनपा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

“लखीमपूरचे आंदोलन दडपवण्यासाठीच केंद्र सरकारने जाणीवपूर्वक फेसबुक, इन्स्टाग्राम बंद केलं”

“…तर संपूर्ण आशियाला भयंकर आणि विनाशकारी परिणाम भोगावे लागतील”

मोठी बातमी! या कारणामुळे पुणे विमानतळ ‘इतक्या’ दिवसांसाठी राहणार बंद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More