बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपचा स्थापना दिवस; प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरात नवीन झेंडा फडकवण्याच्या सूचना

मुंबई |  प्रजासत्ताक भारतातल्या सत्तारूढ पक्षाचा म्हणजे भारतीय जनता पक्षाला आज 40 वर्ष पूर्ण होत आहे. पक्ष 41 व्या वर्षात प्रवेश करतोय. अगदी 2 खासदारांपासून आता 303 खासदारापर्यंत पक्ष पोहचला आहे. आज वर्धापनदिनाच्या निमित्ताने पक्षाने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी काही सूचना केल्या आहेत.

सर्व कार्यालये आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरात पक्षाचा नवीन ध्वज फडकवा, असा आदेश कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पक्षातर्फे देण्यात आला आहे. तसंच ध्वजारोहन करताना एकमेकांपासून अंतर ठेवून उभा पहा. कोरनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन देखील पक्षाने केलं आहे.

कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घरी दीनदयाल उपाध्याय आणि शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांवर पुष्प अर्पण करावं. तसंच सर्व कार्यकर्त्यांनी लॉकडाऊनदरम्यान एका वेळेचं जेवण त्यागून त्रासलेल्या लोकांबद्दल सहानभुती व्यक्त करा, अशीही सूचना पक्षातर्फे दिली गेली आहे.

दरम्यान, 40 व्या स्थापना दिनानिमित्त आपल्या 40 घरांशी संपर्क साधावा आणि 5 धन्यवाद पत्रांवर सही घ्यावी. हे पत्र डॉक्टर व नर्स , पोलिस, सफाई कर्मचारी, बँकेचे कर्मचारी तसंच सरकारी कर्मचारी यांना धन्यवाद देण्यासाठी असतील. ही पत्र आपल्या क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांना द्यावीत, असंही कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाला पळविण्यासाठी भाजपच्या महिला अध्यक्षाचा हवेत गोळीबार, पाहा व्हिडीओ

सांगलीत दिवे लावण्याच्या कारणावरुन जोरदार हाणामारी

महत्वाच्या बातम्या-

अब_आगे_क्या; जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा मोदींवर निशाणा

आजची धक्कादायक बातमी; महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाचे 113 नवे रुग्ण

मोदींच्या आवाहनाला देशवासीयांचा प्रतिसाद; घराघरात पेटले दिवे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More