Top News महाराष्ट्र मुंबई

भाजपचं 24 फेब्रुवारीला राज्यात 287 ठिकाणी जेलभरो आंदोलन- चंद्रशेखर बावनकुळे

Photo Credit- Twitter/Chandrashekhar Bavankule

मुंबई | राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊसामुळे अनेक शेतकऱ्यांंचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही सरकारकडून मदत मिळालेली नाही. याच पार्श्वभूमीवर भाजप येत्या 23 फेब्रुवारीपर्यंत आमदार, खासदारांना निवेदन देणार आहे. त्यानंतर भाजप 24 फेब्रुवारी रोजी 287 ठिकाणी जेलभरो आंदोलन करणार असल्याची घोषणा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

राज्य सरकारने दमदाटी करुन, पोलीस बळाचा वापर करुन शेतकऱ्यांची वीज कापली. सरकारने फसवी कृषी संजीवनी योजना आणली. शेतकऱ्यांकडे 50 टक्के वीजबील भरायला पैसे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

कोणतही डिस्कनेक्शन न करता शेतकऱ्यांना वीज देता येत असल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. भाजपने याआधी वीजबिलविरोधात महावितरणाच्या कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन केलं होत. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेलभरो आंदोलनाची घोषणा केली आहे.

दरम्यान, राज्य सरकार सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप बावनकुळे यांनी राज्य सरकारवर केला आहे. तसंच संजय राठोड कुठे आहेत हे कोणाला माहित नाही. सरकार एरवी ट्विट करतं पण आता का करत नाही?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…हा तर सरकारच्या अस्तित्वहीनतेचा पुरावा’; गजानन मारणेनेेने काढलेल्या मिरवणुकीवरून चित्रा वाघ आक्रमक

आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे भाव…

तहानलेल्या सापाला वनाधिकाऱ्याने बाटलीने पाजलं पाणी, पाहा व्हिडिओ

फास्ट-टॅगवरून मनसे नेत्या रूपाली ठोंबरेंचा टोल नाक्यावर राडा, व्हिडीओ व्हायरल!

…म्हणून महाराष्ट्रात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं- आशिष शेलार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या