मुंबई | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून दिल्लीतील चालू शेतकरी आंदोलनाचा केंद्र सरकारवर म्हणावा असा दबाव विरोधी पक्ष टाकू शकला नाही. शिवसेनेनं याच खापर काँग्रेसच्या माथी फोडलं. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केलं आहे.
दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन मरतुकड्या विरोधी पक्षामुळे ‘पेटत’ नसल्याची खंत सामनाच्या अग्रलेखात व्यक्त केली आहे. ही तर कमालच झाली. महाराष्ट्राचा ‘वाघ’ गेले आठ महिने घरी बसून मोदी-शहांवर भडिमार करतोय. मुखपत्रातून आग ओकतोय,त्यालाही घरच्यांनीही मरतुकडा म्हणावं हे जरा अतिच नाही का?, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
भाजपविरोधक यूपीएमध्ये सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत. प्रियंका गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, ठाकरे सरकार यांना काम करू दिले जात नाही. त्यांची अडवणूक होत आहे. त्याला कारण मरतुकड्या अवस्थेत पडून राहिलेला विरोधी पक्ष!, असं शिवसेनेच्या अग्रलेखात म्हटलं होतं.
दरम्यान, अतुल भातखळकरांच्या टीकेवर भाजपकडून काय प्रत्युत्तर येत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन मरतुकड्या विरोधी पक्षामुळे ‘पेटत’ नसल्याची खंत सामनाच्या अग्रलेखात व्यक्त केली आहे.
ही तर कमालच झाली. महाराष्ट्राचा ‘वाघ’ गेले 8महिने घरी बसून मोदी-शहांवर भडिमार करतोय.मुखपत्रातून आग ओकतोय,त्यालाही घरच्यांनीही मरतुकडा म्हणावं हे जरा अतिच नाहीका?— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 26, 2020
थोडक्यात बातम्या-
‘सरकारनं तो निर्णय मागं घ्यावा’; अबू आझमींचं उद्धव ठाकरेंना पत्र
मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी!
लठ्ठ व्यक्तींनो वेळीच सावध व्हा; संशोधनातून समोर आला मोठा धोका!
रामाला मानणारे वचन कसे मोडतात- अण्णा हजारे
“अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा आणि त्यांच्या जागेवर…”