बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नागपूरात काळ्या बुरशीचं थैमान सुरूच; मृत्युच्या आकड्याचं शतक

नागपूर | गेल्या वर्षीपासून कोरोनाने संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर पहिल्या लाटेपासूनच कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. मात्र आता नागपूरात कोरोना रूग्णसंख्येमध्ये लक्षणीय घट होत असल्याचं समोर आलं आहे. मात्र, काळ्या बुरशीची रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे.

मंगळवारी दिवसभरात नागपूर विभागामध्ये नव्याने 31 जणांना काळ्या बुरशीचे संक्रमण झाल्याचं निदान करण्यात आलं आहे, तर आणखी 6 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. आतापर्यंत विभागात 1325 जणांना म्युकरमायकोसिस या आजाराचं निदान झालं आहे. त्यातील सर्वाधिक 1122 रुग्ण हे एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे आता नागपूर शहरात कोरोनाने जरी थांबा घेतला असला तरी म्युकरमायकोसिसने थैमान घातलं आहे.

मंगळवारी उपचारादम्यान 6 जणांचा काळ्या बुरशीने मृत्यु झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मरण पावलेल्यांचा आकडाही आता शतक ओलांडून 108 वर पोचला आहे. आतापर्यंत मरण पावलेल्या 108 जणांपैकी 94 टक्के म्हणजे 102 मृत्यू फक्त नागपूर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे आता प्रशासन या आजाराच्या दृष्टीने पावलं उचलताना दिसत आहेत.

दरम्यान, एकेकाळी कोरोनाचं हाॅटस्पाॅट बनलेल्या नागपूरमधुन आता दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत 8 हजार 914 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लाॅकडाऊन नंतर मात्र नागपूरातली परिस्थिती सुधारत आहे.

थोडक्यात बातम्या-

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासी संख्या घटल्याने पुणे विभागातील ‘या’ रेल्वे गाड्या राहणार बंद

राज्यातील 12वी बोर्डाची परीक्षा रद्द होणार?; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं सुचक वक्तव्य

पुणे महापालिकेच्या जॅमरवर मनसे नगरसेवक वसंत मोरे यांचा खळखट्याक हातोडा; पाहा व्हिडिओ

टी 20 वर्ल्ड कपसाठी ‘हे’ 3 गोलंदाज घेऊ शकतात भुवनेश्वर कुमारची जागा

“गरज नसताना उपसमितीचं अध्यक्षपद मराठा समाजाच्या अजित पवार यांना कसं?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More