बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

CDS जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताचं नेमकं कारण येणार समोर?

नवी दिल्ली | देशाचे पहिले CDS जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. जनरल बिपीन रावत हे सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सैन्याच्या IAF MI 17 या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते तरीही त्यांचा अपघात झाला. यामुळे सुरक्षा यंत्रणेच्याही भुवया उंचावल्या.

हा अपघात नेमका कसा झाला? खरंच अपघात होता की घातपात? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. या दुर्दैवी घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना जनरल बिपीन रावत यांचा अपघात नेमका कसा झाला याचं कारण अखेर समोर येणार आहे. (IAF Helicopter Crash)

दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स (Black Box) अखेर सापडला आहे. अपघात घडला त्या आजूबाजूच्या 300 मीटर ते 1 किलेमीटरच्या परिसरात ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू होता. अखेर ब्लॅक बॉक्सचा शोध लागल्याने अपघाताचं नेमकं कारण समोर येणार आहे.

दरम्यान, जनरल बिपीन रावतसह आणखी 13 जण त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. या अपघातात 14 पैकी 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जनरल बिपीन रावत यांचं पार्थिव आज दिल्लीत आणणार असून शुक्रवारी शासकिय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

लसीच्या डोसची ऑर्डर मिळत नसल्यानं अदर पुनावांलांनी घेतला म्हत्त्वाच्या निर्णय!

सोनं-चांदी दरात घसरण; वाचा आजचे ताजे दर

‘अपघात नेमका कसा घडला?’, राजनाथ सिंगांनी लोकसभेत संपूर्ण घटनाक्रम सांगितला

…अन् बिपीन रावत यांच्या आयुष्याचा शेवटही डिसेंबरमध्येच झाला!

बिपीन रावत यांच्या अपघातापूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More