मुंबई | मुंबईतील घरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी BMC ने राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याने मुंबई मनपाला याबाबत आपलं उत्तर दिलं.
आता पुन्हा एकदा मुंबई मनपाने राणा दाम्पत्याला नोटीस बजावत इशारा दिला आहे. राणा दाम्पत्याचं मुंबईतील खार परिसरात घर आहे. या घरात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणी मुंबई मनपाने राणा दाम्पत्याच्या घराची पाहणी सुद्धा केली होती.
राणा दाम्पत्याने मुंबई मनपाला आपली बाजू मांडत उत्तर दिलं. मात्र त्यांनी दिलेलं उत्तर अमान्य असल्याचं बीएमसीने म्हटलं आहे.
घरात करण्यात आलेल्या बांधकामत नियमांचं उल्लंघन झालं आहे. हे अनधिकृत बांधकाम 7 ते 15 दिवसांत पाडावं नाही तर महानगरपालिका यावर कारवाई करेल असं मुंबई मनपाकडून सांगण्यात आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“ज्यांच्या हातात आपल्या बायकोचं नियंत्रण नाही, ते…”
“पूर्वीसारखाच भारत निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत”
नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाच्या निर्णयाने खळबळ
कंगनाच्या ‘धाकड’पेक्षा कार्तिकचा ‘भूल भुलैया 2’ सरस, पहिल्या दिवसाची कमाई आली समोर
‘काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे, ही भोकं शिवणार कशी?’; शिवसेनेचा प्रहार
Comments are closed.